अभिनेत्री शर्लिन चोप्राचे सोशल मीडियावर वर्चस्व आहे. शर्लिन तिच्या नवनवीन कारनाम्यांमुळे सर्वांचे लक्ष तिच्याकडे वेधून घेते. शर्लिनच्या कपड्यांपासून ते तिच्या कृत्यांपर्यंत सर्व काही इंटरनेटवर चर्चेचा भाग बनले आहे. शर्लिनचे व्हिडिओ दररोज व्हायरल होत आहेत. जरी शर्लिनचे नाव अनेक वादांशी देखील जोडले गेले आहे. पण ती तिचं आयुष्य मस्त जगते.
शर्लिनचा एक व्हिडिओ चर्चेत आहे. खरंतर शर्लिनने लग्नासाठी होकार दिला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये शर्लिनला विचारण्यात आले होते की, तिला राहुल गांधींसोबत लग्न करायला आवडेल का? ज्याला उत्तर देताना ती होय म्हणते. यापुढे शर्लिननेही लग्नासाठी एक अट घातली आणि लग्नानंतरही शर्लिन चोप्राच राहावे असे तिला वाटते.
शर्लिनचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर यूजर्स त्यावर सतत कमेंट करत आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, राहुल गांधींनी तिच्याशी लग्न करून आयुष्य वाया घालवू नये. तिच्या या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. शर्लिन चोप्रा अनेकदा वादाचा भाग बनली आहे. तिच्या वक्तव्यांमुळे ती चर्चेत राहते. जेव्हा तिने बिग बॉसच्या घरातून साजिद खानला बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले तेव्हा या तिचे नाव चर्चेत आले. साजिदला बाहेर काढण्यासाठी अभिनेत्रीने पोलिस ठाण्यापर्यंत फेऱ्या मारल्या होत्या. साजिदविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली होती.