नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेने आपल्या अभिनयाने लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे. ती तिच्या प्रत्येक पात्रात जीव ओतते. गेल्या काही वर्षांत अभिनेत्रीने चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. राधिका सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे आणि तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी पोस्ट शेअर करत असते. आता राधिकाचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये तिला ओळखणे कठीण झाले आहे.
राधिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा लूक पूर्णपणे बदललेला आहे. तिला एका दृष्टीक्षेपात ओळखणे देखील कठीण झाले आहे. पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये अभिनेत्रीचे केस खूपच लहान आणि विखुरलेले आहेत. तिचे कपडेही घाणेरडे दिसत आहेत. अभिनेत्रीचा हा फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. राधिकाचा हा लूक तिच्या ‘पार्च्ड’ चित्रपटातील आहे. ज्यामध्ये तिने 2016 मध्ये काम केले होते. गुजरातच्या पार्श्वभूमीवर बनलेल्या या चित्रपटात तिने लज्जोची भूमिका साकारली होती.
‘पार्च्ड’ चित्रपटात राधिका आपटेने आदिल हुसैनसोबत जबरदस्त इंटिमेट सीन्स दिले होते. ज्यामुळे चित्रपट क्षेत्रात खबळळ उडाली होती. या चित्रपटातील बोल्ड सीन्सची बरीच चर्चा झाली होती. राधिका आणि आदिलशिवाय सुरवीन चावला, लहार खान, तन्निष्ठ चॅटर्जी, सयानी गुप्ता यांसारख्या स्टार्सनी या सिनेमात काम केले होते.
राधिका आपटेने 2005 साली ‘व्वा! ‘लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘पार्च्ड’, ‘बदलापूर’, ‘पॅडमॅन’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘मांझी: द माउंटनमॅन’, ‘अंधाधुन’ आणि ‘बाझार’ हे तिचे प्रसिद्ध चित्रपट आहेत. राधिका शेवटची 2020 मध्ये ‘रात अकेली है’ चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम केले होते. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला हा सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट सर्वाना चांगलाच आवडला.