मुंबई : ‘आयएनएस विक्रांत’साठी निधी जमा करून त्यात कोट्यवधींचा घोटाळा केल्याच्या आरोपप्रकरणी सत्र न्यायालयाने भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. याच प्रकरणावरून गोळा केलेल्या वर्गणीचे पैसे लाटल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
तर याच पार्श्वभूमीवर अटकपूर्व जामिनासाठी किरीट सोमय्या यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर त्यांच्या वकिलाने पैसे जमा करण्यासाठी राजभवनात कुठलेही खाते नसल्याने सोमय्या यांनी हा निधी पक्षाला दिला असल्याचा युक्तिवाद केला आहे. यावरूनच राष्ट्रवादीने भाजपवर टीका केली आहे.
केवळ सूडबुद्धीने महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत कारवाई केली जात आहे. तर दुसरीकडे जनतेचे पैसै हडप करणारे भाजप नेते कोणावर कारवाई होणार याची भाकिते करण्यात मश्गूल आहेत. #INSVikrant #saveinsvikrant #funding #scam pic.twitter.com/6yf72kxQJ4
— NCP (@NCPspeaks) April 12, 2022
राष्ट्रवादीने अधिकृत ट्वीटरवर पोस्ट केली आहे की,’केवळ सूडबुद्धीने महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत कारवाई केली जात आहे. तर दुसरीकडे जनतेचे पैसै हडप करणारे भाजप नेते कोणावर कारवाई होणार याची भाकिते करण्यात मश्गूल आहेत.’ असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.
यालयाने जामीन अर्ज फेटाळताच किरीट सोमय्या पहिल्यांदाच समोर आले आहेत. यावेळी त्यांनी आपली बाजू स्पष्ट करताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करत उलट आरोप लावले आहेत.
किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सोमय्या यांनी पोस्ट केलेल्या १ मिनिटं २९ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांनी २०१३ साली राष्ट्रपतींची भेट घेतल्याची आठवण करुन देत राऊतांवर निशाणा साधला आहे. तसेच आपण उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणासंदर्भातील सर्व माहिती देणार असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले आहे.