शिक्रापूर, (वार्ताहर) – फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार केल्याची घटना शिक्रापूर येथे घडली आहे. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून एकावर गुन्हा दाखनल करण्यात आला आहे.
भागाजी बारकू भांड (रा. जारकरवाडी, ता. आंबेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पीडित महिलेशी भागाजी भांड याची ओळख झालेली असल्याने तो महिलेच्या घरी येत होता. त्याने महिलेसोबत फोटो काढलेला होता. एक दिवस महिला घरी एकटी असताना भागाजी याने महिलेचे फोटो प्रसारित करून बदनामी करेल अशी धमकी देत महिलेवर अत्याचार केला.
त्यानंतर वारंवार महिला घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेत त्याने असेच कृत्य केले. भागाजी याच्याकडून वारंवार त्रास होत असल्याने महिलेने घडलेला सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला. याबाबत पीडित महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी आरोपी भागाजी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.