मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या स्वतःच्या नावाचा दमदार ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री ‘मृणाल ठाकूर’ सध्या चांगलीच चर्चेत आहे. सर्वच स्तरातून मृणालच्या अभिनयाचं कौतुक होत असतं. अभिनय असो वा बोल्ड फोटोशूट मृणालने अनेक आघाडीच्या नायिकांना मागे टाकले आहे. मृणाल ठाकूर सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या मृणालचे इंस्टाग्रामवर मिलियन मध्ये फॉलोव्हर्स आहेत.
दरम्यान, आता पुन्हा एकदा अभिनेत्री चर्चेत आली असून याच कारण देखील तितकंच खास आहे. यंदाचा कान्स फिल्म फेस्टिव्हल 16 मेपासून सुरू होत आहे. या महोत्सवात अनेक बॉलिवूड अभिनेत्री आपली फॅशन दाखवणार आहेत. आता या यादीत मृणाल ठाकूरच्या नावाचाही समावेश झाला आहे. सीता-रामम या चित्रपटात उत्कृष्ट अभिनय करून मृणालने खूप लोकप्रियता मिळवली आहे.
कान्स पदार्पणाबद्दल बोलताना मृणाल म्हणाली, “मी प्रथमच कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होताना खूप उत्साहित आहे. अशा प्रतिष्ठित व्यासपीठावर ग्रे गूजचे प्रतिनिधित्व करणे ही एक सन्मानाची गोष्ट आहे. त्यांच्याशी संवाद साधण्यास उत्सुक आहे, नवीन संधी भारतीय सिनेमाची प्रतिभा शोधून दाखवा.” असं अभिनेत्री म्हणाली आहे.
दरम्यान, यावेळी कान्स फिल्म फेस्टिव्हल फ्रान्सच्या किनारपट्टीच्या फ्रेंच रिव्हिएरामध्ये होणार आहे. या खास प्रसंगी जगभरातील अनेक स्टार्स रेड कार्पेटवर आपली मोहिनी घालणार आहेत. यानिमित्ताने रेड कार्पेटवर अनेक स्टार्स आपली मोहिनी घालणार आहेत. तसेच, या फेस्टिव्हलमध्ये स्क्रिनिंगसाठी महिला आणि पुरुषांसाठी ड्रेस कोड सेट करण्यात आला आहे. महिला कॉकटेल ड्रेस घालू शकतात. ब्लॅक टॉप, ब्लॅक ट्राउजर आणि डार्क ट्राउझर किंवा इतर फॉर्मल ड्रेसचा पर्यायही आहे. त्याचप्रमाणे पुरुषांना डिनर जॅकेट किंवा सूट घालावे लागतील.