मुंबई – सोशल मीडियावरील टीव्ही अँकर आणि अभिनेत्री महालक्ष्मी चित्रपट निर्माते रवींद्रन चंद्रशेखरशी लग्न केल्यापासून चांगली चर्चेत आहे. त्यांच्या लग्नाचे फोटोही तुफान व्हायरल झाले होते. चित्रपट निर्मात्याशी लग्न केल्यामुळे महालक्ष्मीला खूप ट्रोल करण्यात आले होते. तिने पैशांसाठी रवींद्र चंद्रशेखरशी लग्न केल्याचे यूजर्सने कंमेंट्स करत तिला ट्रोल केले होते.
मात्र, महालक्ष्मी आणि रवींद्र चंद्रशेखर यांनी यावर कोणालाच काही सांगितले नाही. त्याचवेळी हे जोडपे काही दिवसांपासून वेगळे होणार असल्याची चर्चा होत होती. विभक्त होण्याच्या बातम्यांदरम्यान महालक्ष्मीने तिच्या पतीसोबतचा एक नवीन फोटो शेअर केला होता.
फोटो शेअर करताना ती लिहिते की, ‘त्याने मला कितीदा सांगितले एकटीचे फोटो टाकू नको. अशा फोटोमुले सोशल मीडियावर आमच्या विभक्त झाल्याची चर्चा रंगतात. असं कॅप्शन देते महालक्ष्मी पुढे लिहिले की, माझ्या दुसऱ्या लग्नात कोणतीही अडचण नाही. यासोबतच ट्रोल्सना असेही सांगण्यात आले की, लोक त्यांच्याबद्दल काहीही म्हणतील, पण ते एकमेकांवर खूप प्रेम करतात.