मुंबई – टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करने (Deepika Kakkar) जूनमध्ये एका चिमुकल्या मुलाला जन्म दिला. तिचा पती शोएब इब्राहिमने (Shoaib Ibrahim) सोशल मीडियाद्वारे ही बातमी शेअर केली होती. त्यानंतर आता दीपिका कक्करने तिच्या मुलाचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. नुकतेच दीपिका, शोएबने त्यांचा मुलगा रुहानसोबतचा एक अतिशय गोंडस फोटो शेअर केला आहे.
टीव्ही अभिनेता शोएब इब्राहिमची पत्नी दीपिका कक्करने 21 जून रोजी मुलाला जन्म दिला. ही अभिनेत्रीची प्री-मॅच्युअर डिलिव्हरी होती. त्यामुळे तिचा मुलगा खूप अशक्त होता. जन्मानंतर बाळाला अनेक दिवस एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. यानंतर काही वेळाने या दाम्पत्याचा मुलगा घरी परतला तेव्हा कुटुंबीयांनी त्याचे जोरदार स्वागत केले होते. ज्याचे फोटो दीपिकाने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर आता त्यांनी तिघांचा सुंदर फोटो शेअर केला आहे. ज्यात दीपिका आणि शोएब रूहानची पापी घेताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुम्हा सर्वांना मुलगा रुहानची ओळख करून देत आहे. कायमच आमच्यावर आशीर्वाद राहुद्या.”
View this post on Instagram
याआधी दीपिका कक्करने तिच्या यूट्यूब चॅनलवर एक अतिशय गोंडस व्हिडिओ शेअर करून तिच्या मुलाच्या नावाचा खुलासा केला होता. व्हिडिओमध्ये दीपिकाने सांगितले होते की तिने तिच्या मुलाचे नाव “रुहान इब्राहिम” ठेवले आहे, ज्याचा अर्थ “दयाळू, आध्यात्मिक” आहे. दरम्यान, दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांचा विवाह 2018 मध्ये झाला होता. ‘ससुराल सिमर का’ या शोच्या सेटवर दोघेही प्रेमात पडले होते. यानंतर त्यांनी एकत्र आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला. दीपिका सलमान खानच्या रिअॅलिटी शो बिग बॉस 12 ची विजेती देखील ठरली आहे.