malaika arora – 49 वर्षांची ‘मलायका अरोरा’ जेव्हा-जेव्हा कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा ती तिच्या सौंदर्याची अशी जादू निर्माण करते की चाहते बेभान होऊन जातात. आजकाल मलायका सतत कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात आपल्या हटके लूकने फॅन्सला वेड लावताना दिसत आहे. तिचा सोशल मीडियावर स्वतःचा असा मोठा चाहता वर्ग असून, फॅशन तिच्या फोटो आणि व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव करत असतात.
सध्या मलायका अरोरा झलक दिखला जा 11 मध्ये जजच्या भूमिकेत आहे. झलक दिखला जा 11 ची एक खास पार्टी नुकतीच पार पडलीये. या पार्टीला अनेक कलाकार उपस्थित राहिले. सध्या पार्टीतील एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये सर्वजण धमाल करत आहेत. । malaika arora
View this post on Instagram
यावेळी सर्वांचे लक्ष हे मलायका अरोरा हिच्याकडे जाताना दिसत आहे. यावेळी तिने जबरदस्त डान्स केला आहे. व्हिडीओमध्ये मलायका बॉयफ्रेंड अर्जुन कपूर याच्यासोबत नाही तर, अभिनेता शोएब इब्राहिम याच्यासोबत रोमान्स करताना दिसत आहे. मलायका अरोरा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. । malaika arora
या व्हिडीओमध्ये ‘छैया छैया..’ गाण्यावर मलायका अरोरा आणि शोएब इब्राहिम हे डान्स करताना दिसत आहेत. मलायका अरोरा हिचा हा डान्स व्हिडीओ तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडताना दिसत आहे. ब्लॅक ब्रालेटमध्ये ग्लॅमरस लूकमध्ये मलायका अरोरा ही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. । malaika arora
तुम्हाला सांगायचं झाल्यास, यापूर्वी देखील मलायका अरोरा आणि शोएब इब्राहिम यांनी झलक दिखला जा कार्यक्रमाच्या सेटवर सोबत डान्स केला होता. त्यांचा हा रोमँटिक व्हिडीओ सुद्धा चांगलाच व्हायरल झाला होता.
दरम्यान, नुकतंच मलायका अरोराचा पहिला पती अरबाज खान याने वयाच्या 57 व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. अरबाज याने मेकअर आर्टिस्ट शूरा खान हिच्यासोबत लग्न केलंय. दोघांच्या लग्नासाठी संपूर्ण खान कुटुंब उपस्थित होतं. या सोहळ्याचे अनेक व्हिडिओ-फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. । malaika arora