करोनाचा धोका देशासह सर्वात जास्त मुंबई आणि उपनगरांमध्ये असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधील करोनाग्रस्तांचा आकडा झपाटयाने वाढत आहे. मराटी अभिनेत्री अंकिता लोखंडे ज्याठिकाणी मुंबईत राहते, ते अपार्टमेंट देखील आता सील करण्यात आले आहे. तिच्या कॉम्प्लेक्समधील एक रहिवासी करोना पॉझिटिव्ह आढळल्याने ही खबरदारी घेण्यात आली आहे.
मालाडमधील या अपार्टमेंटमध्ये अनेक कलाकार वास्तव्यास आहेत. अशिता धवन, शैलेश गुलबनी, नताशा शर्मा, आदित्य रेडिज, मिशकत वर्मा हे कलाकार देखील अंकिताच्याच अपार्टमेंटमध्ये राहतात. या ठिकाणी असलेल्या एक विंगमधील रहिवाशी स्पेनमधून परतला होता. विमानतळावर स्क्रीनिंगवेळी तो नेगिटिव्ह दाखवण्यात आला. त्यामुळे तो 14 दिवसांसाठी होम क्वारंटाइन होता. मात्र बाराव्या दिवशी त्याच्यामध्ये करोनाची लक्षण दिसू लागली. दरम्यान, या दाम्पत्याची भेट घेतलेल्या कोणामध्येही अद्याप करोनाची लक्षण दिसून आलेली नाही आहेत. याठिकाणी पोलीस तैनात असून कोणासही येण्यास व जाण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे अंकिताने सांगितले.