Actor Vinayakan – साऊथचा सुपरस्टार ‘थलैवा’ रजनीकांत (rajnikanath) यांच्या नुकतंच प्रदर्शित झालेल्या ‘जेलर’ (Jailer) सिनेमाने रुपेरी पडद्यावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. प्रेक्षकांनी देखील या चित्रपटाला मोठा प्रतिसाद दिल्याचं यावेळी पाहायला मिळालं होत. आणि त्यामुळे ‘जेलर’ने तिकीट बारीवर दमदार कमाई देखील केली होती.
दरम्यान, अश्यातच ‘जेलर’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता विनायकन (Actor Vinayakan) याला मंगळवारी पोलिसांनी अटक (Arrested) केल्याची बातमी समोर आली आहे.
Just IN : Actor Vinayakan arrested by the Ernakulam North Police allegedly for causing a disturbance at the local police station.
The police said that the arrest was due to the disruption of the police station. The actor was taken… pic.twitter.com/Kd8mYgr9mt
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) October 24, 2023
मद्यधुंद (Drunk) अवस्थेत पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी आणि पोलीस स्टेशनच्या कामकाजात अडथळा आणणे या आरोपांखाली पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली होती. नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, विनायकन राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये गोंधळ निर्माण केल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर चौकशीसाठी त्याला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आल होतं.
विनायकनने असभ्य वर्तन केल्यामुळे त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. तो मद्यधुंद अवस्थेत होता असंही आम्हाला समजलं’. असं पोलीस विभाकडून सांगण्यात आलं आहे.