Dharmaveer 2: अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) याची मुख्यभूमिका असलेला ‘धर्मवीर’ हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला. या सिनेमात आनंद दिघेंची कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने मोठी कमाई केली. या चित्रपटाच्या यशानंतर ‘धर्मवीर 2’ (Dharmaveer 2) देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. आता या चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाच्या शुटींगला सुरूवात झाली असून यातील काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे.
निर्माते मंगेश देसाई यांनी धर्मवीर आनंद दिघेंची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओक याचे काही फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटो शेअर करत मंगेश देसाई यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “असा हा ‘धर्मवीर”…. तीच करारी नजर आणि तोच करारी बाणा! ‘धर्मवीर’ च्या अभूतपूर्व यशानंतर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संघर्षमय जीवनप्रवासाची गाथा उलगडणारा आणि ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ उलगडून सांगणारा मंगेश देसाई निर्मित आणि प्रवीण तरडे दिग्दर्शित ”धर्मवीर – 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट” या चित्रपटाच्या मुहूर्तानंतर आज चित्रपटाच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला आहे.”
View this post on Instagram
पुढे त्याने लिहिले की, “लवकरच अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशभराला धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. यामुळे सज्ज व्हा, धर्मवीर पुन्हा येतायत आपल्या भेटीला…!!” मंगेश देसाईची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते देखील या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे.