Mahaparinirvan Din : आज 6 डिसेंबर असून आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन आहे. देशभरात आजच्या दिवशी महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. हा दिवस देशभरात भीम अनुयायींसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो.
1956 मध्ये याच दिवशी दिल्ली येथील राहत्या घरी डॉ. आंबेडकर यांचे निधन झाले. त्यामुळे, या दिवसाला ‘महापरिनिर्वाण दिन’ (Mahaparinirvan Din) म्हटले जाते. हा दिवस कोलंबिया आणि कॅनडा या देशात ‘आंबेडकर समानता दिवस’ म्हणूनही साजरा केला जातो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने, ‘महापरिनिर्वाण’ (Mahaparinirvan Din) चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मराठमोळा अभिनेता प्रसाद ओकने (prasad oak) ‘महापरिनिर्वाण’ या सिनेमाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.
View this post on Instagram
व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे,”महामानवाच्या दिव्य आणि तेजस्वी राखेच्या कणांतून घडलेली…एक ऐतिहासिक गोष्ट..!भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन!”.
‘महापरिनिर्वाण’ हा चित्रपट या ऐतिहासिक प्रसंगाचा समाजावर व त्या व्यक्तीच्या जीवनावर झालेल्या खोल परिणामांवर प्रकाश टाकणारा आहे. या चित्रपटाद्वारे प्रसाद ओक, गौरव मोरे, अंजली पाटील, कमलेश सावंत, दीपक करंजीकर, प्रफ्फुल सावंत , विजय निकम , हेमल इंगळे, कुणाल मेश्राम यासारखे नामवंत कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.