Prasad Oak : अभिनेता प्रसाद ओकने (Prasad Oak) अभिनयासह दिग्दर्शन क्षेत्रात मोठे यश संपादन केले आहे. त्यानंतर आता त्याने चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. 2024 या नवीन वर्षात प्रसादने नवे घर खरेदी केले आहे. यंदाची नव्या वर्षाची त्याची दमदार सुरुवात झाली आहे.
प्रसाद ओकने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत नव्या घराची झलक दाखवली आहे. मात्र त्याच्या घराबाहेरील नेमप्लेटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. महामार्गांवर किमी दर्शविण्यासाठी असलेल्या पाट्यांसारखी नेमप्लेट प्रसादच्या घराची आहे. त्याच्यावर ओक असं लिहिलेलं असून घराचा खोली क्रमांकही लिहिल्याचं दिसत आहे. त्याच्या घराला खास लाडकाचा दरवाजा बसविण्यात आला आहे. तर घराबाहेरील जागेतही सुंदर असे इंटेरिअर केल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने चाहत्यांना नवीन वर्षाच्या देखील शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
घर खरेदी केल्याबाबत प्रसादचं सेलिब्रिटींनी अभिनंदन केलं आहे. तर अनेक चाहत्यांनीही त्याच्या पोस्टवर कमेंट करत त्याचे अभिनंदन केले आहे. प्रसाद ओकने 2023 वर्षा अखेरीस काल त्याच्या नव्या चित्रपटाची माहिती चाहत्यांबरोबर शेअर केली होती. “वर्षाच्या अखेरीस…नवी सुरुवात…नवा चित्रपट ‘रीलस्टार’”, असे लिहित प्रसादने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर आज वर्षाच्या सुरुवातीलाच प्रसादने आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. दरम्यान, प्रसाद ओक लवकरच धर्मवीर 2 ,पठ्ठे बापूराव, वडापाव, महापरिनिर्वाण, रीलस्टार या नव्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.