मुंबई – कोरोना काळ संपल्यानंतर चित्रपटगृह सुरु झाले आणि साऊथ चित्रपटांचा बोलबाला सुरु झाला. हिंदी चित्रपटांनी साऊथच्या चित्रपटांसमोर अक्षरशः लोटांगण घातल्याचे प[पाहायला मिळाले. बड्या बिग बजेट हिंदी सिनेमाना प्रेक्षकांनी घरचा रास्ता दाखवला अशात मराठी सिनेमांनी मात्र जबरदस्त पाय रोवत चांगली कमाई केली. यात सरसेनापती हंबीरराव,धर्मवीरसह अनेक चित्रपटांचा समावेश आहे. सरसेनापती हंबीररावच्या टीमने याबाबतच एक पोस्ट केली आहे. जिची सध्या सिने वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
२७ मे रोजी आपला ‘सरसेनापती हंबीरराव’ प्रदर्शीत झाला..२७ मे नंतर आजपर्यंत जवळपास ३० पेक्षा अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट प्रदर्शीत झाले पण यातील कोणताही चित्रपट २ ते ३ दिवसापेक्षा अधिक काळ चाललेला नाहीये..बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरणारा गेल्या अडीच तीन महिन्यातील आपला सरसेनापती हंबीरराव हा शेवटचाच चित्रपट आहे..सध्याच्या काळात कोणताही चित्रपट हा चित्रपटगृहात सुपरहिट होण्याचं प्रमाण अतिशय दुर्मिळ होतयं..असं या पोस्टमध्ये म्हंटल आहे.
प्रेक्षकांचे मानले आभार
अशा काळात आपण मायबाप मराठी रसिक प्रेक्षकांनी आमच्या सारख्या फिल्म इंडस्ट्रीची कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या ‘उर्विता प्रॉडक्शन’ च्या पहिल्या वहिल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाला ज्या पद्धतीने उचलून धरलं त्याबद्दल आपले आभार मानायला आज अक्षरशः शब्द अपुरे आहेत..आपण ‘सरसेनापती हंबीरराव’ हा आपल्या घरचा चित्रपट समजून जे प्रेम दिलंत आणि ज्या पद्धतीने चित्रपटगृहात हा चित्रपट चालवलात, न्हवे मी तर म्हणेन अक्षरशः वाजवलात, त्याच सर्व श्रेय हे सर्वस्वी फक्त आणि फक्त तुमचंच आहे..
View this post on Instagram
त्या बद्दल आपल्या सर्वांचे टीम सरसेनापती हंबीरराव आणि उर्विता प्रॉडक्शन तर्फे मी जाहीर आभार व्यक्त करतो..आपले प्रेम असेच निरंतर राहो..येत्या काळात आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमरुपी ऋणातून उतराई होण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नरत राहू.. अशा आशयाची पोस्ट सरसेनापती हंबीररावाच्या सोशल मीडिया हॅन्डलरवरून करण्यात आली आहे.