मुंबई – आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत राहणाऱ्या अभिनेता आणि बिग बॉस स्पर्धक एजाझ खान याला मुंबई पोलिसांनी द्वेषमूलक भाषेचा वापर केल्याप्रकरणी गेल्या १८ एप्रिलला अटक केली होती. या प्रकरणी आता एजाझ खान याला जमीन मिळाला आहे. बांद्रा महानगर दंडाधिकाऱ्यांनी एजाझ खान याला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जमीन मंजूर केलाय.
नेमकं काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एजाज खानने एक लाइव्ह व्हिडीओ केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने द्वेषमूलक भाषेचा वापर करत ‘कायम मुस्लीम नागरिकांनाच का दोषी धरलं जातं?, असा प्रश्न विचारला होता. तसेच या व्हिडिओद्वारे एजाझ कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात देखील आक्षेपार्ह बोलत असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्याच्या या व्हिडिओची दखल घेत खार पोलिसांनी त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या 153 A, 117, 188, 501, 504, 505 कलमाअंतर्गत गुन्हे दाखल केला होता.