जळोची : दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने बारामतीतल्या गोविंदबाग या ठिकाणी पवार कुटुंब दरवर्षी एकत्र येत असतात. शनिवारी शरद पवार आणि अजित पवार हे दिवाळीनिमित्त प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी एकमेकांना भेटले होते. दरम्यान, पवार कुटुंबातील अनेक सदस्य देश विदेशात वास्तव्यास असतात. त्यांना एकत्र आणण्यासाठी हा कार्यक्रम दरवर्षी गोविंदबागेत साजरा करण्यात येतो. यंदाही हा कार्यक्रम साजरा करण्यात येत असून पवार कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे.
राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यापासूनच शरद पवार आणि अजित पवार हे दिवाळीसाठी एकत्र येणार का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. शनिवारी शरद पवार आणि अजित पवार हे एकमेकांना दिवाळीच्या निमित्ताने भेटले. अशात गोविंदबाग या शरद पवारांच्या बारामतीतल्या निवासस्थानी शरद पवार आणि इतर पवार कुटुंबीय जमले आहेत मात्र अजित पवार आलेले नाहीत.
दरम्यान, पवार कुटुंबातील अनेक सदस्य देश विदेशात वास्तव्यास असतात. दरम्यान, शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी व दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक, राजकीय, कलाक्रीडा, आधी विविध क्षेत्रातील दिग्गजांसह अनेक जण गोविंद बागेत दाखल होत असतात. अनेक वर्षांची ही परंपरा सुरू असून आजही पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी गोविंद बागेत अनेक जण दाखल झाले आहेत.