Rohit Pawar – राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांच्या या यात्रेची सुरुवात २४ ऑक्टोबरला शरद पवारांच्या सभेने झाली होती मात्र राज्यातील राज्यातील मराठा आंदोलनाची परिस्थिती आणि युवकांची स्थिती पाहता काही दिवसांपूर्वी ही यात्र रद्द करण्यात आली होती. अशात आता पुन्हा ही यात्रा सुरु होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेत आदित्य ठाकरे सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १६ नोव्हेंबरपासून चौंडीमधून युवा संघर्ष यात्रा सुरु होणार आहे. दरम्यान चौंडी येथे सभेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ठाकरे गटाच्या उपनिता सुषमा अंधारे, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम उपस्थित राहणार आहे.
तत्पूर्वी, रोहित पवारांच्या या यात्रेची सुरुवात २४ ऑक्टोबरला शरद पवारांच्या सभेने झाली. मात्र रोहित पवार यांनी युवा संघर्ष स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात्र रद्द करण्याचे कारण रोहित पवार यांनी सांगितले आहे. जरांगे पाटलांनी पुकरालेल्या आंदोलानाची परिस्थिती दिवसागणिक तीव्र झाले. त्यामुळे त्यांची परिस्थिती, राज्यातील आंदोलनाची परिस्थिती आणि युवकांची स्थिती पाहता हा निर्णय घेणं गरजेचं आहे. राज्यातील मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. पुणे ते नागपूर असं ८०० किलोमीटरहून अधिकचं अंतर ही यात्रा ४५ दिवसांत गाठणार आहे, या मार्गावरील जिल्ह्यांमधील युवकांशी रोहित पवार संवाद साधून ते प्रश्न जाणून घेणार आहे. बेरोजगारी, दत्तक शाळांच्या निमित्ताने शिक्षणाचे खाजगीकरण, नोकर भरती अशा अनेक प्रश्नांनावर रोहित पवार या यात्रेदरम्यान युवकांशी संवाद साधणार आहे. शिक्षक भरती अशा अनेक मुद्द्यांना या यात्रेत हात घातला जाणार आहे.