बोगस डॉक्‍टरांसह तलाठ्यांवर होणार कारवाई

bogus-doctors

ग्राहक संरक्षण परिषदेत प्रशासकीय सेवेचे वाभाडे, तलाठ्यांविरोधात अनेक तक्रारी  

नेवासे – जिल्ह्यातील तलाठ्यांकडून कामास होणारा विलंब, त्यासाठी पैशाची मागणी, बोगस डॉक्‍टरचा सुळसुळाट, फळे पिकविण्यासाठी घातक कार्बाइडचा वापर, वजन मापे तपासणी, मावा – गुटख्याची सर्रास विक्री, बसस्थानक परिसरातील रस्त्यावरील अडथळे, तालुकास्तरीय बैठका, ग्रामदक्षता समिती, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरप्रकार, गॅस सिंलेडर वाहतुक भाडे, शासकीय जागेतील पार्किंग, विज वितरणची कामे आदि विषयावर ग्राहक संरक्षण परिषद प्रशासकीय सेवेचे वाभाडे काढण्यात आले. यावेळी कामात विलंब लावणारे तसेच बोगस डॉक्‍टरांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नगर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक अतिरिक्त जिल्हाधिकारी पिराजी सोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. बैठकीत काही तलाठी नियुक्‍तीच्या ठिकाणी रहात नाहीत. खरेदी नोंदी, ई-करार नोंदीस विलंब व टाळाटाळ करणे, 85 कलमानुसार वाटपास नकार देणे, त्या माध्यमातुन पैशाची मागणी करणे आदी तक्रारी करण्यात आल्या. अशा तलाठ्यांची तक्रारीसह नावे दिल्यास तसेच बोगस डॉक्‍टरांची नावे व पत्ते मिळाल्यास कारवाई करु असे सोरमारे यांनी स्पष्ट केले. कार्बाइड या घातक पदार्थाने फळे पिकवून विकणारे, मावा गुटखा विकणारे, विज वितरणच्या कामात निष्काळजीपणा व दुर्लक्ष करणारे कर्मचारी, वजन मापांची तपासणी, एस.टी.वाहतुकीस अडथळे ठरणारे, बस स्थानक परिसरातील अतिक्रमण व अडचण, 15 कि.मि.अंतरावर दुसरी गॅस एजन्सी असेल तर सिलेंडर वाहतुक खर्चात सुट, शासकीय कार्यालयाच्या आवारातील पार्किंग बंद करणे. तालुकास्तरावरच ग्राहक समस्या व प्रश्न सुटावे म्हणुन ग्राहक संरक्षण परिषदेच्या सर्व अशासकीय सदस्यांनी तालुकास्तरीय सर्व बैठकीस उपस्थित रहाण्याबाबत संबंधितांना आदेश देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

ग्रामपंचायतीकडे मागणी करुन डास व साथरोग होणार नाहीत, यासाठी फवारणी करणे, बैठकीस उपस्थित न राहणाऱ्या व तक्रारी – प्रश्न यांची वेळेत समाधानरक उत्तरे न देणाऱ्या शासकीय सदस्यांवर कारवाई करणे, स्टेट बॅंकेच्या ग्रामीण शाखेत आठवड्यात 1 दिवस शाखेतील व्यवहार बंद का? आदिंवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. बैठकीस अतुल कुऱ्हाडे, कारभारी गरड, डॉ. रजनीकांत पुंड, सुनिल रुणवाल, अशोक शेवाळे, विलास जगदाळे, डॉ. उमाकांत पुंड, अमिता कोहली, शाहुराव औटी, अरुण कुलट, सुरेश रहाणे, डॉ. श्रीकांत पठारे अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.