पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील वडमुखवाडी येथील मोहननगर भागातील रेड झोन मधील अनधिकृत बांधकामावर आज पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली. सलग दुसऱ्या दिवशी महापालिकेची अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे. आज वडमुखवाडी येथील 39 अनधघिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. त्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 39 हजार 167 चौरस फूट इतके आहे. या कारवाईसाठी 3 पोकलेन, 5 जेसीबी, 25 मजूर व महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली.
ही कारवाई अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सह शहर अभियंता मकरंद निकम यांचे उपस्थितीत करण्यात आली.यावेळी कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांचे नियत्रंणाखाली उपअभियंता हेमंत देसाई, सुर्यकांत मोहिते, सुधीर मोरे तसेच 5 कनिष्ठ अभियंता व एकूण 15 बीट ऑफीसर उपस्थित होते. पोलीस विभागामार्फत उपायुक्त सुधीर हिरेमठ, पोलिस निरीक्षक मोहन शिंदे, प्रकाश जाधव, 3 पीएसआय व 42 पोलीस कर्मचारी तसेच आरसीपी चे 23 कर्मचारी यांचे उपस्थितीत कारवाई करण्यात आली.