शिरूर -टाकळीहाजी (ता. शिरूर) येथील ओंकार कृषी सेवा केंद्रावर खतांचा साठा, शेतकऱ्यांना जादा दराने विक्री केल्याप्रकरणी कृषी अधिकारी निलेश बुधवंत यांनी कारवाई केली आहे.
येथील कृषी सेवा केंद्रात युरीया खत शिल्लक असुनही शेतकऱ्यांना दिले जात नव्हते, त्याबाबत शेतकऱ्यांनी माजी उपसरपंच अजित गावडे यांना माहीती दिली. त्यांनी खासदार अमोल कोल्हे, तहसीलदार लैला शेख यांच्याशी संपर्क साधुन माहिती दिली.
त्यानेतर कृषी अधिकारी निलेश बुधवंत यांनी दुकानाची तपासणी केली असता युरीया खताचा साठा उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या समोर आम्हाला 320 रुपयाला युरिया विक्री केल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. दुकानदार यांनी खत विक्री केल्याचे सांगितले.
मात्र नोंदवही अध्ययावत नव्हती, खरेदीचे पक्के बिल नव्हते, परंतु त्याचे चलन त्यांच्याकडे होते. विक्री आणि साठा याचा ताळमेळ जुळत नसल्याने खताचा साठा आढळला आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर अहवाल सादर करून कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.