सातारा – जिल्ह्यात करोनाचा वाढता कहर सुरू असतानाच एकाच दिवशी सहा रुग्णांचा करोनामुले मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्याला धक्का बसला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात करोनामुळे 80 रुग्णांचा जीव गमावला आहे. दरम्यान, जिल्ह्या आणखी 69 जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 2213 झाली आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील एकूण 69 नागरिकांचा अहवाल करोनाबाधित आला आहे तर सहा बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. या रिपोर्टनुसार सहाशे लोकवस्ती असलेल्या पुनवडी गावात पुन्हा एकाच दिवशी 22 रुग्म निष्पन्न झाले. त्यामुळे तेथील रुग्णसंख्या 113 झाली आहे. तर वाई शहर व तालुक्यातही करोनाची धास्ती वाढली आहे.
वाई तालुक्यात नवे 19 रुग्ण आढळले आहेत. या 69 करोनाबाधित रुग्णांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे. जावळी तालुक्यातील पावशेवाडी येथील 40 वर्षीय महिला, बामणोली येथील 50 वर्षीय पुरुष, पुनवडी येथील 35, 61, 36, 70, 29, 30, 27, 25, 50, 90, 25, 39, 02,वर्षीय पुरुष, 28, 55, 27, 31, 11, 30, 55, 06, 25, वर्षीय महिला, मेढा येथील 13 वर्षीय पुरुष, सायगाव येथील 70 वर्षीय पुरुष., वाई तालुक्यातील भुईंज येथील 53 वर्षीय पुरुष.
वाई येथील 37, 41 वर्षीय महिला, ब्राम्हणशाही येथील 45, 20, 48, 75, 40, 40 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, सोनगीरवाडी येथील 41 वर्षीय पुरुष, यशवंतनगर येथील 22, 8, 11, 6, 22 वर्षीय पुरुष, 20, 32, 9, वर्षीय महिला., सातारा तालुक्यातील शेळकेवाडी येथील 75 वर्षीय पुरुष, सातारा येथील 45 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 77 वर्षीय पुरुष.,
कराड तालुक्यातील सैदापूर येथील 60 वर्षीय महिला, शेणोली येथील 70 वर्षीय महिला, खुबी येथील 78 वर्षीय महिला., खंडाळा तालुक्यातील खंडाळा येथील 45, 64 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय महिला, विंग येथील 27 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 60 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष., कोरेगांव तालुक्यातील शिरंबे येथील 55 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष, वाठार किरोली येथील 64, 37 वर्षीय पुरुष.
71 वर्षीय महिला, चिमणगाव येथील 18 वर्षीय महिला., खटाव तालुक्यातील नेर येथील 74 वर्षीय पुरुष., महाबळेश्वर तालुक्यातील दापवडी येथील 2, 38 वर्षीय पुरुष, 7 वर्षीय महिला., पाटण तालुक्यातील कासणी येथील 53 वर्षीय पुरुष, कासरुड येथील 33 वर्षीय पुरुष.
शहरातील बाधितासह सहा जणांचा मृत्यू
शेळकेवाडी (ता. सातारा) येथील 75 वर्षीय पुरुष, नेर (ता. खटाव) येथील 74 वर्षीय पुरूष, सातारा येथील 45 वर्षीय पुरुष यांचा करोना संशयित म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात उपचार करताना घेण्यात आलेला नमुना करोनाबाधित असल्याचे रिपोर्ट काल रात्री उशिरा प्राप्त झाले. तसेच नेरले (ता. पाटण) येथील 50 वर्षीय पुरूष अशा चौघांचा आणि कराडच्या शारदा हॉस्पिटलमध्ये सैदापूर (ता.कराड) येथील 60 वर्षीय महिला व कालगाव (ता.कराड) येथील 65 वर्षीय महिला अशा एकूण सहा बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.