gauri khan – बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या ‘डंकी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. किंग खान त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो.
View this post on Instagram
किंग खान आणि गौरी खान हे बी-टाऊनचे पॉवर कपल मानले जाते. हे जोडपे 32 वर्षांपासून सुखी वैवाहिक जीवन जगत आहे. शाहरुख खानने 25 ऑक्टोबर 1991 रोजी गौरी खानशी लग्न केले. अशात आता अशी चर्चा होत आहे की, गौरी खान अभिनयाला सर्वात वाईट प्रोफेशन मानते. गौरी खानने घरात काही नियम बनवले आहे, जे किंग खानला पाळावे लागतात. याशिवाय शाहरुख खानला घरात चित्रपटांशी संबंधित कोणतेही काम करण्याची परवानगी नाही.
अलीकडेच गौरी खानने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, ‘आम्ही त्याच्या कामाबद्दल घरी कधीही चर्चा करत नाही. शाहरुख कधी हिंदी चित्रपटाचा व्हिडीओ बघायला बसला तर मला वाटतं की मी टीव्ही तोडेन. जर त्याने घरी स्क्रिप्ट आणली तर ती थेट खिडकीच्या बाहेर जाते. या सगळ्यासाठी त्याच्याकडे सेटवर भरपूर वेळ असतो.’
गौरी खानने नियमांचे किती काटेकोरपणे पालन केले, याचा अंदाज यावरून लावता येतो की, गौरी घरी नसतानाच शाहरुख खानला भेटायला कोणताही चित्रपट निर्माता येत असे. अशात सोशल मीडियावर गौरीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 1994 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, ‘ती अभिनयाला सर्वात खराब प्रोफेशन मानते. इंडस्ट्रीतून तिला कितीही मोठी ऑफर आली तरी ती त्याला कधीच हो म्हणणार नाही.’ असे ती म्हणाली होती.