Shraddha Kapoor : अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) आपल्या उत्तम अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ केले आहे. तिच्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या ती ‘स्त्री 2’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता ‘स्त्री 2’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच श्रद्धाचा शूटिंगदरम्यानचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
श्रद्धा कपूरचा एक फोटो ‘फिल्मफेअर’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुनशेअर करण्यात आला आहे. तिचा फोटो पाहून अनेकांनी हा ‘स्त्री 2’ चित्रपटाच्या शूटींगदरम्यानचा असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या फोटोत श्रद्धा कपूर ही लांब वेणी, कपाळावर टिकली, डोळ्यात काजळ अशा लूकमध्ये दिसत आहे. यात श्रद्धाने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि त्यावर करड्या रंगाचा जॅकेट परिधान केला आहे. यावेळी तिच्या हातात एक समोसाने भरलेली प्लेट पाहायला मिळत आहे. सध्या तिचा हा लुक पाहून चाहत्यांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिने ‘स्त्री 2’ या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करत असल्याचे म्हटले होते. श्रद्धा कपूरने ‘स्त्री 2’ चित्रपटातील एक थरारक व्हिडीओ शेअर केला होता. या पोस्टवर “पुन्हा एकदा चंदेरी शहरात पसरली स्त्रीची दहशत, ऑगस्ट 2024 मध्ये ती येणार…”असे कॅप्शन दिले होते. हा चित्रपट याच वर्षी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरचा ‘स्त्री’ हॉरर-कॉमेडी चित्रपट आजही प्रेक्षक आवडीने बघतात. 2018 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. श्रद्धाशिवाय राजकुमार राव, पंकज त्रिपाठी आणि अभिषेक बॅनर्जी हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पहिल्या भागानंतर आता सहा वर्षांनी ‘स्त्री 2’ रिलीज होईल.