मुंबई – शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. एएनआय या वृत्त संस्थेनं याबाबतचं वृत्त दिलंय. यांनतर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ट्विटरव्दारे प्रतिक्रिया देत उध्दव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
तुषार भोसलें यांनी म्हटले आहे की, “स्वार्थासाठी ‘हिंदुत्वाशी’ गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरेंचा आज नियतीनेच बदला घेतला! देव, धर्म आणि साधु-संतांवर अन्याय केल्याने उद्धव ठाकरे ते ‘उध्वस्त’ ठाकरे असा प्रवास..”
स्वार्थासाठी ‘हिंदुत्वाशी’ गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरेंचा आज नियतीनेच बदला घेतला ❗️
देव, धर्म आणि साधु-संतांवर अन्याय केल्याने
उद्धव ठाकरे ते ‘उध्वस्त’ ठाकरे असा प्रवास ‼️@OfficeofUT
— Acharya Tushar Bhosale (@AcharyaBhosale) February 17, 2023
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की,” हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वाटचाल करीत हिंदूत्त्व आणि सत्यासाठी संघर्ष करणार्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याबद्दल मी त्यांचे आणि राज्यातील तमाम शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो.”
तर दुसरीकडे निवडणूक आयोगाचा आजचा निर्णय हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.