Acharya Pramod Krishnam expelled। काँग्रेस पक्षाने त्यांच्या पक्षातील आचार्य प्रमोद कृष्णम यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे पक्षाने म्हटले. त्यांना ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. पक्षनेतृत्व आणि राहुल गांधी यांच्यावर अलीकडे उघडपणे टीका केली होती.
काँग्रेसचे महासचिव के.सी.वेणुगोपाल यांनी याविषयी माहिती दिली. प्रमोद कृष्णम यांनी वारंवार पक्षविरोधी वक्तव्य केल्यामुळे ही कारवाई केल्याचे त्यांनी म्हटले. उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीने त्यांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र, हा निर्णय अशावेळी घेण्यात आला आहे, जेव्हा अलीकडेच प्रमोद कृष्णम यांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला होता.
राममंदिरवरून पक्षावर साधला निशाणा Acharya Pramod Krishnam expelled।
आचार्य कृष्णम हे पक्षनेतृत्वावर वारंवार टीका करत होते. राम मंदिराच्या अभिषेकाचे समर्थन करताना त्यांनी काँग्रेसचा बहिष्कार दुर्दैवी असल्याचे म्हटले होते. एवढेच नाही तर त्यांनी इंडिया आघाडीला आजारी पक्षाची आघडी म्हटले. तसेच प्रमोद कृष्णम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,योगी यांना कल्की धामच्या पायाभरणी समारंभासाठी आमंत्रित केले होते.
हेही वाचा
Electoral Bond: भाजप मालामाल, काँग्रेस कंगाल; इलेक्टोरल बाँड्सचा ऑडिट रिपोर्ट जाहीर
कोण आहेत आचार्य प्रमोद कृष्णम ? Acharya Pramod Krishnam expelled।
आचार्य प्रमोद कृष्णम यांचा जन्म बिहारमधील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. आचार्य कृष्णम यांनी संभलमध्ये श्री कल्की फाउंडेशनची स्थापना केली आहे. ते कल्की धामचे पीठाधीश्वर देखील आहेत.
आचार्य प्रमोद कृष्णम यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक लखनऊ लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांचे नाव आचार्य प्रमोद कृष्णम, वडिलांचे नाव दिवंगत जसवंत सिंह असे नमूद केले आहे.
हेही वाचा
राज्यसभा निवडणूक: भाजपचे चार केंद्रीय मंत्री मैदानात, कॉग्रेसचे आमदार अभेद्य किल्ल्यात
काँग्रेस का सोडली? दादांचं नेतृत्व स्वीकारणार? विचारताच बाबा सिद्दीकी स्पष्टच बोलले…