Nikhil Wagle । ‘निर्भय बनो’ सभेला जाणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Journalist Nikhil Wagle) यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) गटाच्या 10 कार्यकत्यांना शनिवारी सायंकाळी पुणे पोलिसांनी अटक केली.
शुक्रवारी पुणे शहरात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचा निर्भय बनो कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आल्यावर भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला केला. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. या हल्ल्यातून निखिल वागळे बचावले. ते कार्यक्रमस्थळी दाखल झाले. त्यांनी कार्यक्रमस्थळी भाषणही केले. अशात घटनेच्या दुसऱ्या दिवशी पुणे पोलिसांकडून स्पष्टीकरण आले आहे.
हेही वाचा :
Pune: भाजप कार्यकर्त्यांकडून पत्रकार निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला, अजित पवारांनी दिले कारवाईचे आदेश
नेमकं काय म्हणाले पुणे पोलिस
पुण्यातील वाताररण निखिल वागळे यांनी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याने तापले होते. ज्यावेळी निखिल वागळे पुण्यात पोहोचल्यावर तेव्हा आमचे पोलीस अधिकारी त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले. त्यांना पुणे शहरातील वातावरणाची माहिती दिली. त्यांना सांगितले की आम्ही सल्ला देत नाही, तोपर्यंत कार्यक्रमस्थळी जाऊ नका, असे सांगितले. कारण कार्यक्रमस्थळाच्या आजूबाजूला मोठ्या संख्येने आंदोलक एकत्र आले होते. आंदोलनकर्त्यांच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच त्यांनी जावे, असे त्यांना सांगण्यात आले. सुमारे 25 आंदोलकांच्या गटाला सायंकाळी 6 वाजेपर्यंत ताब्यात घेण्यात आले असून आणखी काहींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होती. असेही पोलिसांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘आमच्या सल्ल्याविरुद्ध ते घटनास्थळी रवाना झाला आणि प्रत्यक्षात मार्ग बदलून पोलिसांना चकमा दिला. तरीही आमच्या साध्या वेशातील माणसे त्याना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्या गाडीच्या मागे लागली होती.’ असं म्हणत पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे.
हेही वाचा :
पिंपरी | पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन