Baba Siddique on leaving Congress – लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी पक्षाचा हात सोडला आहे. गेल्या काही दिवसांपासून सिद्दीकी काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आज सिद्दीकी यांनी या चर्चा खऱ्या ठरवत पक्ष सोडत असल्याचं जाहीर केलं.
बाबा सिद्दीकी अजित पवार यांचं नेतृत्व स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा देखील सुरु आहेत. अशातच आता बाबा सिद्दीकी यांनी स्वतः ४८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर काँग्रेस का सोडली? तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.
ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी याबाबत भाष्य केलं आहे. ‘पक्षामध्ये काही गोष्टी का घडत आहेत, हे तुम्हाला समजत नसतं आणि त्याबाबत वारंवार सांगूनही त्यामध्ये बदल होत नाहीत, तेव्हा पक्षाला आपली गरज राहिली नसल्याचं लक्षात येत. माझ्या ते लक्षात आलं आणि मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.’ असं सिद्दीकी म्हणाले.
#WATCH | On his resignation from Congress, former Maharashtra minister Baba Siddique says, “…I have said that I extend you an invitation for 10th February…I had to take a decision and I have taken a decision…Why would someone force me? I am an adult…When you don’t… https://t.co/DGeJCLFICV pic.twitter.com/OYcWiPIm2s
— ANI (@ANI) February 8, 2024
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? । Baba Siddique on leaving Congress
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार का, असे विचारले असता आपण याबाबतचा निर्णय १० तारखेला घेणार असल्याचं सिद्दीकी म्हणाले. आपण सर्वांसमोर हा निर्णय घेणार असून १० तारखेला माझी पुढील दिशा सर्वांना समजेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांच्या वक्तव्यावरही भाष्य । Baba Siddique on leaving Congress
बाबा सिद्दीकी यांना यावेळी बांद्राच्या जागेबाबत शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारण्यात आले. ही जागा ठाकरे गटाकडे राहील असं राऊत म्हणाले होते. यावर, ‘स्वप्न पाहणे चांगली गोष्ट आहे. निवडणूक खुलं मैदान आहे, जय पराजय तर होतच असतात’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या
काँग्रेसचा “ब्लॅक पेपर” अन् भाजपचा गंभीर आरोप…
आम आदमी पक्षाचा इंडिया आघाडीला धक्का; परस्पर जाहीर केले उमेदवार…