नगर – सावेडी परिसरातील भिस्तबाग महालाजवळ रात्रीच्या वेळी मारहाण करून लुटणारे दोघे तोफखाना पोलिसांनी अवघ्या पाच तासात जेरबंद केले. त्याच्याकडून एक मोबाइल जप्त करण्यात आला आहे.
शरद सोपान पवार (वय-21, चेतना कॉलनी, नागापूर), विजय भगवान कुऱ्हाडे (वय-19 बोल्हेगाव) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, महेंद्र सुधाकर कुलकर्णी (वय-41, रा. ढवण वस्ती, ता.नगर) हे वीज दुरीस्थीची काम करून घरी परतत असतांना त्यांना भिस्तबाग महालाजवळ त्यांना दोघा अज्ञात व्यक्तीने मारहाण करून त्यांच्याकडील पैसे व मोबाइल घेवून पोबारा केला. यात महेंद्र कुलकर्णी जबर जखमी झाले. याबाबत कुलकर्णी यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
याबाबत प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरूण मुलाणी, एपीआय सुरसे, सहायक पोलीस निरीक्षक भोसल, वसीम पठाण, प्रदीप बडे, जगताप यांनी तपासाचे चक्र फिरवत हा गुन्हा शरद सोपान पवार (वय-21, चेतना कॉलनी, नागापूर), विजय भगवान कुऱ्हाडे (वय-19 बोल्हेगाव) यांनी केला असल्याचे समजले. त्यानुसार दोन पथके तैनातकरून आरोपींना अवघ्या पाच तासात तोफखाना पोलिसांनी जेरबंद केले.