नेपाळमधील ओली सरकारमधून मधेशींचा पक्ष बाहेर

काठमांडू : नेपाळमधील के.पी.शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट पार्टीच्या सरकारमधून मधेशी समाजाचे नेतृत्व करणारी समाजवादी पार्टी-नेपाळ हा पक्ष बाहेर पडला आहे. ओली यांनी राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव फेटाळल्यामुळे “एसपी-एन’पक्षाने सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे.

उप-पंतप्रधान आणि कायदे, न्याय आणि संसदीय कार्यमंत्री असलेले एसपी-एनचे अध्यक्ष उपेंद्र यादव आणि नगरविकास मंत्री मोहम्मद इस्तिक राय यांनी पंतप्रधान ओली यांना राजीनामा दिला आहे. गेल्या वर्षी सरकारमध्ये सामील होताना “सपा-एन’ने सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांसमवेत तीन कलमी करार केला होता. “सपा-एन’ पक्षाच्या मागण्यांमध्ये राज्यांची पुनर्रचना, संघराज्य व जातीय अस्मिता, मधेशी व इतर उपेक्षित गटांचे नागरिकत्वांचा समावेश होता.

तथापि, अशी मागणी पंतप्रधानांनी पूर्ण केली नाही आणि आम्हाला सरकार सोडण्यास भाग पाडले, असे पक्षाच्या उपाध्यक्ष हिसिला यमी यांनी सांगितले.
मधेशींच्या समाजवादी पक्षाने पाठिंबा काढून घेतल्यामुळे ओली सरकारकडे आता दोन तृतीयांश बहुमत उरलेले नाही. संसदेच्या 275 सदस्यांमध्ये “सपा-एन’कडे 17 जागा आहेत. तर सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पार्टीकडे 174 जागा आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.