पर्यटनासाठी आलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या बसला अपघात

कोल्हापूर : कोल्हापुरमध्ये पर्यटनासाठी आलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ११ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत तर ३ शिक्षक देखील जमखी झाल्याची माहिती समोर येत आहे.

शालेय सहलीची बस जोतिबा रोडला पलटी झाली. यात 11 विद्यार्थिनी आणि 3 शिक्षक जखमी झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील विटा इथल्या इंदिराबाई भिडे कन्या प्रशालेची ही बस होती. जोतिबा दर्शन करून कोल्हापूरकडे परतत असताना दानेवाडी जवळ हा अपघात झाला.

आज सकाळी 3 बसेसद्वारे पन्हाळा, जोतिबा आणि कणेरी मठ या ठिकाणी सहलीसाठी  हे विद्यार्थी आले होते. अपघाताची माहिती मिळताच तातडीने 108 च्या दोन रुग्णवाहिकेतून विद्यार्थिनींना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

व्हिडीओ

Leave A Reply

Your email address will not be published.