सावधान… चार्जिंग पॉइंट करेल घात

“ज्यूस जॅकिंग’द्वारे फोनमधील माहिती चोरी होण्याचा धोका
पुणे  –अनेकदा अचानक फोनचे चार्जिंग कमी झाल्याची आठवण आपल्याला होते. विशेष दीर्घ प्रवासावेळी फोनचे चार्जिंग कमी झाल्यानंतर अडचण येते. अशावेळी लोक विमानतळ, रेल्वे स्टेशन, बसस्टॅंड किंवा हॉटेलमधील चार्जिंग स्टेशनवर फोन चार्ज करण्याचा प्रयत्न करतात, मात्र हे चार्जिंग करताना काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा फोनमधील माहितीची चोरी होऊ शकते, असा सावधगिरीचा इशारा स्टेट बॅंकेने आपल्या ग्राहकांना दिला आहे.

आपण जेव्हा फोन चार्जिंगसाठी लावतो, त्यावेळी केवळ एकतर्फी वीज आपल्या फोनच्या बॅटरीमध्ये येण्याची गरज असते. मात्र, ज्यूस जॅकिंग नावाच्या यंत्रणेमध्ये वीज बॅटरीमध्ये येण्याबरोबरच फोनमधील माहिती परत जाण्याची कॉर्ड लावलेली असते. या ज्यूस जॅकिंगपासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याची गरज असते. चार्जिंग स्टेशनवर सॉकेटच्या मागे काही यंत्रणा लावली आहे का याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर चार्जिंग साठी स्वतःचा चार्जर किंवा केबल असावी.

चार्जिंग स्टेशनवर फक्‍त इलेक्‍ट्रिकल आउटलेट असेल याची काळजी घेऊन आपल्या चार्जरने चार्जिंग करावी. त्याचबरोबर योग्य स्त्रोतांकडून पोर्टेबल बॅटरी घ्याव्यात, अशा सूचना स्टेट बॅंकेने ट्‌विटरवरून ग्राहकांना दिल्या आहेत. त्यामुळे चार्जिंग स्टेशन ठिकाणी या बाबीकडे डोळेझाक करू नये. तत्पूर्वी याठिकाणी ज्यूस जॅकिंग यंत्रणा तर नाही ना, याची खबरदारी घ्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.