‘छपाक’चा ट्रेलर आऊट

मुंबई – अॅसिड अटॅक पीडित लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनावर आधारित ‘छपाक’ या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी फर्स्ट लूक प्रदर्शित केला होता. या चित्रपटाच्या मध्यवर्ती भूमिकेत दीपिका पदुकोण झळकणार आहे. या फोटमध्ये दीपिका पदुकोण पूर्णतः लक्ष्मी अग्रवाल यांच्यासारखी दिसत आहे.

दरम्यान, छपाक  चित्रपटाचा ट्रेलर आज अखेर प्रदर्शित झाला. अॅसिड हल्ला तरुणी लक्ष्मी अग्रवाल हिच्या सोबत झाली ती दुर्दैवी घटना आणि त्या घटनेनंतर तिने सुरु केलेला लढा या ट्रेलरमधून दाखविण्यात आला आहे. अंगावर काटा आणणारा आणि डोळ्यांच्या कडा ओलावणारा या ट्रेलरमध्ये दीपिकाच्या दमदार अभिनयाची झलकही पाहायला मिळेल.

या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहे. तर दीपिका पदुकोणही या चित्रपटाची निर्मिती करत आहे. दीपिकासह विक्रांत मेसीही चित्रपटात मुख्य भूमिका निभावत आहे. या चित्रपटात दीपिकाचे नाव मालती असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.