– किकवी गावच्या हद्दीत घटना
कापूरहोळ – पुणे-सातारा महामार्गावर पुण्याकडून सातारच्या दिशेने जाणारी कार ने एकास जोरदार धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पोलीस अंमलदार योगेश लक्ष्मण राजीवडे यांनी राजगड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
सदर घटनेबाबत माहिती अशी की,गुरुवारी (१ फेब्रुवारी) रात्री ९:३० चे सुमारास महामार्गावर कीकवी गावचे हद्दीत महींद्रा कंपनीच्या कार ने (एम एच १४ एल ए ९२२१) धडक दिल्याने अनोळखी पादचारी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना किकवी तालुका भोर गावच्या हद्दीत कोहीनूर हॉटेल अँड बारसमोर घडली.
राजगड पोलीस ठाण्यात याबाबत वाहन चालक विक्रांत आनंद कदम (वय ४० वर्षे, रा. दत्तनगर, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातातील मयत पुरुषाचे अंदाजे वय ५०-५५ वर्षे असून ओळख पटू शकली नाही. अधिकचा तपास राजगड पोलिस करीत आहेत.