पोलीस आयुक्तांकडून शिवीगाळ; फोन रेकॉर्डिंग व्हायरल  

पुणे –  पुणे पोलीस आयुक्त शांत, संयमी आणी उत्तम प्रशासक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या संपर्कात आलेले नागरिक तसेच पोलीस अधिकाऱ्यांनाही याची अनेकदा प्रचिती येते. पोलीस खात्यातील अथवा नागरिकांची कोणतीही समस्या असेल तर ते शांतपणे ऐकून त्यावर निर्णय देतात. दररोज सायंकाळी साडेचारनंतरचा वेळ त्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी राखीव ठेवलेला असतो. दिवसभराच्या बैठका, नियोजन आणी कामाच्या दगदगितही ते भेटीला आलेल्या अगदी शेवटच्या नागरिकासाठी कार्यालयात उपस्थित असतात. नागरिकाचे समाधान होईपर्यंत त्यांचे म्हणणे ऐकून घेत अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाही करण्याची सूचना देतात. मात्र नुकतीच पोलीस आयुक्तांनी एका नागरिकाला शिवी दिलेले मोबाईल रेकॉर्डिंग सोशल मिडीयावर टाकण्यात आले आहे. तसेच गृहमंत्र्यांनाही यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे असे काय घडले की पोलीस आयुक्तांचा संयम सुटला याचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे. हे रेकॉर्डिंग निट ऐकले असता, त्यामध्ये फक्त पोलिस आयुक्तांनी शिवी दिलेलाच रेकॉडेड भाग आहे. यापुर्वीचा आणी नंतरचा संवाद असलेले रेकॉडींग नाही.

यासंदर्भात रेकॉर्ड टाकणाऱ्या आणी कारवाईची मागणी करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधला असता, त्यांनी समाजसेवक असून विद्यापीठांमधील गैरकारभार चव्हाट्यावर काढण्याचे आपण कार्य केल्याचे सांगितले. आपण राज्यातील जवळपास 11 विद्यापीठांतील बोगस कोर्स बंद केले आहे. पुणे विद्यापीठातही बेकायदा पद वाढवून दुप्पट पगार घेत शासनाची फसवणूक करणाऱ्यांविरुध्द न्यायालयात जनहित याचीका दाखल केली आहे. यामध्ये न्यायालयाने शासनाला फटकारले आहे. यासंदर्भात कॅगची समिती नेमण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. यासंदर्भात गुन्हा दाखल व्हावा यासाठी आपण पोलीस पोलीस उपायुक्तांशी संपर्क साधला होता. मात्र त्यांनी दखल न घेता पोलीस आयुक्तांशी संपर्क साधा असे सांगितले. यामुळे पोलीस आयुक्तांशी फोनवर संपर्क साधला, मात्र त्यांनी म्हणणे ऐकून न घेता शिवी दिली. यामुळे माझ्यासारख्या समाजसेवकाला मोठा धक्का बसला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.