बिग बॉसमध्ये दिसलेल्या जवळपास सर्वच स्पर्धकांचे नशीब चमकले आहे आणि मोठा जॅकपॉट हातात आहे. सौंदर्या शर्माला 2-3 चित्रपटांच्या ऑफर आहेत, तर निमृत कौर अहलुवालियाला ‘लव्ह सेक्स और धोखा 2’ चित्रपटाची ऑफर आली आहेत. त्याचबरोबर अब्दु रोजिक यालाही जोरदार ऑफर मिळाली आहे. अब्दू रोजिकला एका आंतरराष्ट्रीय रिअॅलिटी शोची ऑफर मिळाल्याचे वृत्त आहे. हा तोच शो आहे ज्यात एकदा शिल्पा शेट्टीने भाग घेतला होता आणि जिंकली होती.
वृत्तानुसार, अब्दू रोजिक यांना बिग ब्रदर यूकेची ऑफर मिळाली आहे, आणि त्यांनी ती स्वीकारली देखील आहे. जून किंवा जुलैमध्ये अब्दू या रिअॅलिटी शोच्या शूटिंगसाठी निघणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘बिग ब्रदर यूके’ तब्बल 5 वर्षांनंतर पुनरागमन करत असून तो एका नव्या फॉर्मेटमध्ये दिसणार आहे.
‘बिग बॉस 16’मध्ये दिली होती अब्दू – शिवची जोडी हिट, शिवही घेणार सहभाग ?
बिग बॉस 16 च्या एका एपिसोडमध्ये, अब्दू रोजिकने घरातील सदस्यांशी संवाद साधताना संकेत दिला होता की आता तो आणि शिव ठाकरे ‘बिग ब्रदर’ शो करणार आहेत. दुसरीकडे, ज्योतिषी सौरिश शर्मा गेल्या दिवशी बिग बॉसच्या घरात आले तेव्हा त्यांनी शिव ठाकरेंना सांगितले होते की शोमधून बाहेर पडल्यानंतर एक मोठा रिअॅलिटी शो त्यांची वाट पाहत आहे. त्यामुळे आता शिव ठाकरेही ‘बिग ब्रदर’चा भाग होणार का? शिवने ‘बिग बॉस 16’ मध्ये अब्दूलाही सांगितले होते की तो बाहेर जाऊन ‘बिग ब्रदर’ आणि इतर सर्व रिअॅलिटी शो करेन. ‘बिग बॉस 16’ चा फिनाले 12 फेब्रुवारीला होणार आहे.
अशा प्रकारे अब्दु रोजिक स्टार झाला, सलमानचाही चाहता
अब्दु रोजिकने ‘बिग बॉस 16’ मधून खूप लोकप्रियता मिळवली आहे. ताजिकिस्तानचा राहणारा हा गायक आयफा अवॉर्ड्सदरम्यान सलमानला भेटला होता. त्यानंतर अब्दु रोजिकला ‘बिग बॉस 16’ मध्ये कास्ट करण्यात आले. बिग बॉसचा भाग बनल्यानंतर अब्दू रोजिकची फॅन फॉलोइंग खूप मजबूत झाली. त्यांचे आणि शिव ठाकरे यांच्यातील बॉन्डिंग आणि मैत्री या शोमध्ये चांगलीच आवडली होती.