मुंबई – सर्वांचे मनोरंजन करणारा, ‘बिग बॉस’चा सीझन 16 हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी नॉनफिक्शन टेलिव्हिजन रिएलिटी शो ठरला आहे. यंदाच्या ‘बिग बॉस 16’च्या ट्रॉफीवर बस्ती का हस्ती म्हणून ओळखणारा जाणारा ‘एमसी स्टॅन’ने आपले नाव कोरले असले तरी, या सीझन मधील सर्वच स्पर्धक सतत चर्चेत असतात.
दरम्यान, याच सीझन मधील अभिनेत्री ‘सुंबूल तौकीर खान’ सध्या चालीचं चर्चेत आली आहे. त्याच कारण देखील तितकंच खास आहे. सुंबूल सध्या अभिनेत्री उल्का गुप्ता सोबत उटीमध्ये आहे. तिथे तिच्यावर माकडाने हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. सुंबूलवर माकडाने हल्ला केला असून तिने स्वतः इन्स्टाग्रामवरून त्याबद्दल माहिती दिली आहे.
हल्ला केल्याचा फोटो शेअर करत अभिनेत्रीने मकाडाचा उल्लेख ‘आर्टिस्ट’ म्हणून केला आहे. सध्या अभिनेत्रीचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दोघींनी उटीमधून काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. शिवाय अभिनेत्रीने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री रुग्णालयात असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये सुंबूलची मैत्रीण उल्का गुप्ता देखील दिसत आहे.
दरम्यान, ‘इमली’ फेम सुंबूल तौकीर खान ‘बिग बॉस 16’ नंतर चांगलीच लोकप्रिय झाली असून, तिचा चाहता वर्ग देखील वाढला आहे. ‘बिग बॉस 16’च्या सिझन मध्ये सुंबूल तौकीरला सर्वाधिक फी मिळत होती. तिला आठवड्यासाठी 11 लाख रुपये मानधन मिळायचं.