मुंबई – बाबा निरालाच्या ‘आश्रमात’ जो कोणी येईल, त्याला बाबांच्या वाईट नजरेतून वाचणे कठीण आहे. आश्रमातील बाबांच्या अत्याचाराला कंटाळलेल्या अनेक महिला वेब सिरीजमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. यातील एका मुलीचे नाव आहे कविता. या वेब सिरीजचे आतापर्यंत तीन सीझन आले असून तीनही सीझनमध्ये कविता फक्त फरशी पुसताना दाखवण्यात आली आहे. पण आश्रम वेब सीरिजचा तिसरा सीझन संपताच कविता (अनुरिता झा) आपल्या बोल्डनेसमुळे इतकी चर्चेत आली आहे की ती सतत एकापेक्षा एक बोल्ड फोटो शेअर करत असते. आता कविताने बिकिनी घातलेला असा फोटो शेअर केला आहे जो सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
View this post on Instagram
अनुरीता झाने जहाजावर बसलेला स्वतःचा असा बोल्ड फोटो शेअर केला आहे की,ज्यामुळे ती खूपच चर्चेत आली आहे. यामध्ये अभिनेत्रीने हिरव्या रंगाची बिकिनी घातली आहे. अनुरिताच्या या पोस्टवर अनेकांनी तिला आश्रम सिरींजमधील डायलॉग पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्री श्रग उघडून एका बाजूने खांद्यावरून खाली टाकून बोल्ड पोज देताना दिसत आहे. हा फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर करत अनुरीताने कॅप्शनमध्ये लिहिले – ‘मच निडेड ग्लॅमर.’
View this post on Instagram
बोल्ड सीन दिले
या वेब सीरिजमध्ये अनुरिता झा हिने एका मुलासोबत लिपलॉक सीन दिला होता. काही दिवसांपूर्वीच या अभिनेत्रीने इंटिमेट सीनबाबत वक्तव्य केले होते जे खूप व्हायरल झाले होते. असा सीन करण्यापूर्वी मला माझ्या वडिलांची परवानगी हवी होती आणि त्यांनी ती दिल्याने बरे वाटल्याचे देखील अभिनेत्रीने स्पष्ट केले.