Bobby Deol । बॉबी देओल ‘अनिमल’मध्ये अबरारची भूमिका साकारून सर्वत्र प्रसिद्ध झाला. आता सर्वत्र लॉर्ड बॉबीचे नाव चर्चेत आहे. बॉबीच्या अभिनयाने लोकांच्या हृदय आणि मनाव अधिराज्य गाजवले आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ‘आश्रम’ या वेब सीरिजचा पुढचा सीझन येणार आहे.
‘आश्रम’चे आतापर्यंत तीन भाग आले आहे. चौथ्या सीझनची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. ‘बाबा निराला’ला पुन्हा कधी पाहायला मिळणार असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. मालिकेत भुप्पाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता चंदन रॉयने याबाबत मोठी अपडेट दिली आहे.
एका मुलाखतीत तो म्हणाला,’प्रत्येकजण समान प्रश्न विचारत आहे. मला वाटतं ते या वर्षी यायला हवं. तयारी पूर्ण झाली आहे. थोडा भाग शूटिंगसाठी बाकी आहे आणि काही स्क्रिप्टिंग बाकी आहे. मात्र, ‘आश्रम 4’ची अद्याप निर्मात्यांनी घोषणा केलेली नाही. आता निर्माते कधी घोषणा करणार आणि बाबा निराला त्यांच्या चाहत्यांमध्ये कधी परतणार हे पाहणे बाकी आहे.
या वर्षी बॉबी देओल सुपरस्टार सूर्याचा ‘कांगुवा’ या साऊथ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 10 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अहवालानुसार, या चित्रपटाचे बजेट सुमारे 300 कोटी रुपये आहे. या चित्रपटात बॉबीशिवाय बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी देखील आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला आहे.
हे वाचलं का ? ‘गुड न्यूज’ कधी देणार? प्रेग्नेंसीच्या प्रश्नावर प्रिया बापट म्हणाली…