मुंबई – बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार वर्षभरात अनेक चित्रपटांमध्ये दिसतो आणि सर्व चित्रपट सुपरहिटही ठरतात. पण २०२२ हे वर्ष त्याच्यासाठी चांगले ठरले नाही. या वर्षी त्याचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले असून दोन्ही बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले आहेत. नुकतेच अक्षयने आपल्या एका मुलाखतीत करिअरबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. जे ऐकून अक्षयचे फॅन्स आर्श्चर्य व्यक्त करताहेत.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काही प्रश्नांची उत्तरे देताना अक्षय कुमारने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मुलाखतीत अक्षयला विचारण्यात आले की, तुम्ही बायकोला घाबरता का ? यावर अक्षयने थोडा विचार करत होय मी माझ्या पत्नीला घाबरतो असे उत्तर दिले. त्याचवेळी त्याला विचारण्यात आले की, तुम्ही जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत अभिनेते आहात हे खरं आहे का ?.यावर मला याबाबत कोणतीही माहिती नाही असं अक्षय म्हणाला. फॅन्सने मात्र अक्षयच्या उत्तरावर जोरदार कमेंटबाजी केली आहे.
रक्षाबंधनला संमिश्र प्रतिसाद
अक्षय नुकताच रक्षाबंधन या फॅमिली ड्रामा चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याने एका जबाबदार भावाची भूमिका साकारली होती. जो आई-वडिलांच्या मृत्यूनंतर चार बहिणींच्या लग्नासाठी संघर्ष करतो. रक्षाबंधन या चित्रपटाला सध्या संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.