नवी दिल्ली – दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी ‘आप’चे जेष्ठ नेते व दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. मनीष सिसोदिया यांच्या विरोधात अबकारी धोरणाशी संबंधित प्रकरणात सीबीआयकडून चौकशी सुरु आहे.
या संदर्भात सिसोदिया यांनी जमीन अर्ज मंजूर करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु मंगळवारी (३० मे) रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
मनीष सिसोदिया प्रभावशाली व्यक्ती –
दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे कि ‘मनीष सिसोदिया यांच्यावरील आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. तसेच ते एक प्रभावशाली व्यक्ती असून त्यांची जामिनावर सुटका झाल्यास त्यांच्याकडून साक्षीदारांवर प्रभाव पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मनीष सिसोदिया यांचा जमीन अर्ज फेटाळला आहे.
दरम्यान, मनीष सिसोदिया यांना २६ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली असून सीबीआय कडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु आहे. तसेच दिल्ली उच्च न्यायालयाने सिसोदिया यांचा जमीन अर्ज नामंजूर केल्यामुळे त्यांच्या सीबीआय कोठडीमध्ये २ जून पर्यंत वाढ करण्यात आली आहे.