नवी दिल्ली : जग कितीही बदलले आधुनिक झाले तरी आपल्या देशात महिलांविरुद्ध अत्याचाऱ्यांच्या घटनांमध्ये कोणतीही घट झाल्याचे दिसत नाही कारण याचे जिवंत उदाहरण पंजाब मधून समोर आले आहे. घरगुती हिंसाचाराच्या बळी चक्क एक महिला आमदार झाल्या असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या महिला आमदाराला तिच्या पतीने मारहाण केली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
बलजिंदर कौर असे मारहाण झालेल्या महिला आमदाराचे नाव आहे. त्या तलवांडी साबो या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. या व्हिडिओत बलजिंदर कौर या चर्चा करताना दिसत आहे. तेव्हाच त्यांच्या पतीने त्यांना मारहाण केली आहे. याबाबतचा व्हिडिओ पंजाब युवक काँग्रेसचे अध्यक्ष बरिंदर यांनी ट्विट केला आहे.
Empowering women is not a deterrent to stop violence against women.Shocking to see @BaljinderKaur_ MLA getting slapped in broad day light.Mindset of men has to change.
The problem lies in the perpetrator’s of these acts.Change this male chauvinism attitude more then anything else pic.twitter.com/Qxm6rhrtht— Brinder (@brinderdhillon) September 1, 2022
बरिंदर यांनी ट्विटवर लिहिताना, “आमदार बलजिंदर कौर यांना दिवसाढवळ्या मारहाण करण्यात आली, हे धक्कादायक आहे. पुरूषांची मानसिकता बदलावी लागेल. अन्य काही बदलण्यापूर्वी ही पुरूषप्रधान वृत्ती बदल्ली पाहिजे,” असे म्हटले आहे. याबाबतचे वत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिले आहे.
याप्रकरणाची पंजाब राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांनी दखल घेतली आहेत. “मी समाजमाध्यमांवरती बलजिंदर कौर यांचा व्हिडिओ पाहिला. आम्ही या घटनेची स्वत:हून दखल घेतली आहे. नागरिकांच्या समस्या मांडणाऱ्या महिलेला घरातच छळाचा सामना करावा लागत आहे. हे अस्वस्थ करणार आहे,” असे मनीषी गुलाटी म्हणाल्या.