राज्यपालांना जादा अधिकार देण्याच्या विरोधात “आप” आंदोलन करणार

नवी दिल्ली  – केंद्र सरकारने दिल्ली सरकारचे अधिकार काढून ते राज्यपालांना देण्याचे जे विधेयक संसदेत आणले आहे, त्याच्या विरोधात आज आम आदमी पक्षाच्या आमदार, खासदार आणि नगरसेवकांनी जंतरमंतर येथे उग्र निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. उद्या बुधवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने होणार आहेत. दिल्लीचे विकास मंत्री गोपाल राय यांनी सांगितले की दिल्लीचे सर्व मंत्री आणि आमदारही यात सहभागी होणार आहेत.

केंद्र सरकारने आणलेले हे विधेयक घटनाविरोधी आहे. त्यात लोकनियुक्त सरकारचे अधिकार काढून घेण्याचा डाव आहे असा आरोपहीं त्यांनी केला आहे. केंद्र सरकारने जे जीएनसीटी सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केले आहे त्यात राज्यपालांनाच राज्याचा प्रमुख करण्याचा प्रयत्न होतो आहे असेही त्यांनी म्हटले आहे. हे विधेयक संमत झाले तर दिल्लीच्या संबंधातील कोणताही निर्णय राज्यपालांच्या संमतीशिवाय सरकारला घेता येणार नाही. सरकारकडून निर्णयाचा अधिकार काढून तो राज्यपालांना दिला तर दिल्लीचा विकास थांबेल असेही आम आदमी पक्षाचे म्हणणे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.