लांबी (पंजाब) – आम आदमी पार्टीचा पंजाबशी काहीही संबंध नाही अशा शब्दामध्ये पंजाबचा माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणि अकाली दलाचे नेते प्रकाश सिंग बादल यांनी टीका केली आहे. संपूर्ण बादल कुटुंबीयांसमवेत मतदान केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
“आप’चा पंजाबशी काही संबंधही नाही आणि पंजाबमध्ये या पक्षाचे कोणीही सहानुभूतीदारही नाहीत. पंजाबमध्ये किती आणि कोणकोणते जिल्हे आहेत, हे देखील त्यांना माहिती नाही, असेही बादल म्हणाले.
मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी “युपी-बिहारी’संदर्बात केलेल्या वक्तव्यावर “आपण अन्य राज्यांबाबज जसे वागतो, तसेच वर्तन त्या राज्यांकडून आपल्याबरोबरही केले जाईल.’ अशी प्रतिक्रिया बादल यांनी दिली.
आपल्या कुटुंबातील तीन पिढ्या एकत्र असल्याबद्दल बादल यांनी समाधान व्यक्त केले. अन्य पक्षांमध्ये तिकीट न मिळाल्यास पक्ष सोडून देणाऱ्यांचा प्रमाण अधिक असल्यावर त्यांनी टीका केली. आम्ही गेल्या 3 ते 5 पिढ्यांपासून अकाली दलासोबत आहोत. याकाळात अनेक अडचणी आल्या. मात्र आम्ही साथ सोडली नाही, असेही बादल म्हणाले.
शिरोमणी अकाली दल – बसपा आघाडीला पंजाबमधील निवडणूकीत स्पष्ट बहुमत मिळेल. या आघाडीला किमान 80 जागा मिळतील, असा विश्वास सुखबिर सिंग बादल यांनी व्यक्त केला आहे.