आमीर खानची मुलगी इरा खान रिलेशनशिपमध्ये

बॉलीवूडमधील परफेक्‍ट मॅन अर्थात अभिनेता आमीर खानची मुलगी इरा खान रिलेशनशिपमध्ये आहे. ती वडिलांचे फिटनेस कोच नुपूर शिखर यांना डेट करत आहे. याबाबत नुपूरने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना हिंट दिली आहे. गतवर्षी इरा खानचे एक्‍स-बॉयफ्रेंड मिशाल कृपलानीसोबत फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. आता नुपूरबरोबरच्या फोटोतून इरा पुन्हा प्रेमात पडल्याचे दर्शवित आहेत.

लॉकडाऊन काळापासून इरा खान आणि नुपूर शिखर हे एकमेकांना डेट करत आहेत. जेव्हा इरा खान फिटनेसकडे वळली तेव्हा दोघांची जवळीक वाढली. अलीकडे महाबळेश्‍वरमधील खान फार्महाऊस येथे इरा आणि नुपूर सुट्टीसाठी आले होते. यावेळी दोघांनीही एकमेकांच्या आईची भेट घेतली होती.
असे म्हटले जात आहे की ते दोघेही या नात्याबाबत गंभीर आहेत.

आतापर्यंत आमीर खानची पहिली पत्नी आणि इरा खानची आई रिना दत्ता यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु नुपूरच्या आईने केलेल्या पोस्टवर इरा खान ही भाष्य करण्यास खूपच ऍक्‍टिव असते.

दरम्यान, नुपूरने काही दिवसांपूर्वी आपल्या आईचा फोटो शेअर होता. ज्यावर इराने खूपच सुंदर कमेंट केली होती. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास नुपूर शिखर हा एक सेलिब्रेटी फिटनेस कोच आहे. सध्या तो आमीर खान, इरा खान आणि सुष्मिता सेन यांना प्रशिक्षण देत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.