पॅरिस – मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे कपल सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेक फोटो आणि व्हिडिओ ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या हे दोघे कामामधून ब्रेक घेऊन पॅरिसला गेले आहेत. येथील काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इतरांप्रमाणे सिद्धार्थ आणि मितालीला देखील पॅरिसमधील आयफेल टॉवर समोर उभं राहून फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. मितालीने वेस्टर्न ड्रेस परिधान करत फोटोशूट केले आहे. तर सिद्धार्थने यावेळी ब्लेजर परिधान केलं होतं. त्यांच्या रोमँटिक फोटोशूटवर सध्या लाइक आणि कमेन्टचा वर्षाव होत आहे. अनेक सेलिब्रिटींनी देखील त्यांचे हे फोटोशूट आवडले आहे. सई ताम्हणकर, अमृता खानविलकर या अभिनेत्रींनी त्यांच्या फोटोंना पसंती दर्शवली आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मिताली स्पेनला गेली होती. तिथे मितालीने बिकिनी परिधान करत समुद्रकिनारी फोटोशूट केले होते. या लुकमध्ये ती फारच हॉट अंदाजात दिसत होती. हे फोटो शेअर करत मितालाने नेटकऱ्यांना एक सल्लाही दिला होता. “आज सकाळी उठून मी कॉन्ट्रोव्हर्सीला निवडलं. कमेंट सेक्शनमध्ये ‘आपली संस्कृती’ याबाबत ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला स्वत:ची लाज वाटेल,” असे कॅप्शन तिने या फोटोला दिले होते.