लंडन – दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीमध्ये सर्वात जास्त फटका ब्रिटनला आणि त्यातही ब्रिटनची राजधानी असलेल्या लंडन शहराला बसला होता साहजिकच त्या कालावधीमध्ये जर्मनीच्या बॉम्ब वर्षावापासून वाचण्यासाठी लंडन आणि परिसरामध्ये अनेक ठिकाणी घरांच्या अंगणामध्ये बॉम्ब शेल्टर तयार करण्यात आले होते.
काळाचा ओघात असे बॉम्ब शेल्टर जरी काढून टाकण्यात आले असले तरी ब्रिटनमध्ये लंडनमधील एका महिलेला मात्र तिच्या घराच्या अंगणात हा बॉम्ब शेल्टर सापडला रिबेका हॉबसन असे या महिलेचे नाव असून 2020 नंतरच अशा प्रकारची काही वास्तू अंगणात जमिनीखाली असल्याचे तिच्या लक्षात आले होते तिने त्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते आता मात्र ती वास्तू दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीतील बॉम्ब शेल्टर असल्याचे लक्षात आले आहे घराच्या अंगणातील फरशी काढून टाकल्यानंतर तिच्या नजरेस हा भूमिगत बॉम्ब शेल्टर पडला अर्थात हे एखादी बेसमेंट असावे किंवा जुन्या काळातील एखादी भूमिगत वास्तू असावी असे तिला प्रथम वाटले पण हा दुसऱ्या महायुद्ध कालातील बॉम्बशेटर असल्याचे आता लक्षात आले आहे.
दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीत कालावधीमध्ये जेव्हा जर्मन विमाने लंडनवर बॉम्ब वर्षाव करायला येत असत तेव्हा जोरात भोंगा वाजवला जात असेल आणि हा भोंगा वाजल्यानंतर सर्व नागरिक अशा भूमिगत शेल्टरमध्ये आश्रय घेत असत रिबेका हॉबसन या घरामध्ये गेली पंधरा वर्षे राहत आहे पण कोविडच्या कालावधीमध्ये घरी असताना घराच्या परिसराची स्वच्छता करत असताना अचानक तिला हा शेल्टर दिसला पण ही भूमिगत वास्तू म्हणजे बॉम्ब शेल्टर आहे याची कल्पना तिला नुकतीच आली आहे.