Phanindra Sama : देशातील असे अनेक तरुण उद्योजक आहेत ज्यांनी शून्यापासून निर्मिती करत व्यवसायात मोठे यश मिळवले आहे. असेच एका तरुण उद्योजकाचा प्रेरणादायी प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. फणींद्र सामा हे भारतीय स्टार्टअप इकोसिस्टममधील एक प्रसिद्ध नाव आहे. ते रेडबसचे संस्थापक आहेत. जी आज भारतातील सर्वात मोठी ऑनलाइन बस तिकीट कंपनी आहे. या तरुणाला शिक्षण घेऊन नोकरी मिळाली आणि मग स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहिले आणि या तरुणाने 2 मित्रांसह स्टार्टअप सुरू केले.
फणींद्र सामा यांनी मित्रांसह 5 लाख रुपयांची गुंतवणूक करुन ही कंपनी स्थापन केली होती. सध्या ही कंपनी 7000 कोटींची झाली आहे. सणासुदीच्या काळात घरी जाण्यासाठी बसचे तिकीट काढता न आल्यानं कंपनी सुरु करण्याची कल्पना फणींद्र यांना आली. परंतु आता ही कंपनी इबिबो ग्रुपने विकत घेतली.
कोण आहेत फणींद्र सामा ?
फणींद्र समा यांचा जन्म 15 ऑगस्ट 1980 रोजी तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातील एका छोट्या गावात झाला. फणींद्र समा यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्समधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी तेलंगणाचे मुख्य नवोपक्रम अधिकारी म्हणूनही काम केले आहे. कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांची भेट सुधाकर पळसुपुनुरी आणि चरण पद्माराजू यांच्याशी झाली आणि तिघेही मित्र झाले. रेडबस सुरू करण्यापूर्वी तिघेही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करत होते. नोकरी करत असताना फणींद्र समा यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. 2006 मध्ये फणींद्र समा, सुधाकर पसुपुनुरी आणि चरण पद्माराजू यांनी मिळून रेडबस सुरू केली.
रेडबसची कल्पना कशी सुचली?
सणासुदीच्या काळात आपल्या शहरात जाण्यासाठी बसची तिकिटे काढण्यासाठी धडपडत असताना फणींद्र साम यांना रेडबस सुरू करण्याची कल्पना सुचली. त्याच क्षणी फणींद्रने तिकीट काढण्याबाबत सर्वसामान्य प्रवाशांच्या समस्या आणि अडचणी दूर करणारी यंत्रणा तयार करण्याचा संकल्प केला. फणींद्र सामा यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या रेडबस ऑनलाइन प्लॅटफॉर्मने भारतातील बस तिकीट प्रक्रियेत क्रांती घडवून आणली. या प्लॅटफॉर्ममुळे तिकीट बुकिंग प्रक्रिया सुलभ झाली.
रेडबसची 828 कोटी रुपयांमध्ये विक्री
रेडबसला देशभरात लाखो ग्राहक मिळाले आणि व्यवसाय झपाट्याने वाढला. 2007 मध्ये, रेडबसला $1 दशलक्षचा पहिला निधी मिळाला यावरून कंपनीच्या स्थितीचा अंदाज लावला जाऊ शकतो. देशातील काही मोठ्या गुंतवणूकदारांच्या पाठिंब्याने, redBus काही वर्षांतच ऑनलाइन तिकीट बाजारात आघाडीवर बनले. 2013 मध्ये, रेडबस दक्षिण आफ्रिकेच्या Naspers आणि चीनच्या Tencent यांच्यातील संयुक्त उपक्रम असलेल्या Ibibo Group द्वारे 828 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
फणींद्र सामा काही काळ रेडबसशी निगडीत राहिले आणि नंतर ते इतर व्यवसायात गेले. व्यवसायासोबतच फणींद्र हे विविध सामाजिक व सेवाभावी कार्यात सक्रिय सहभाग घेतात. त्यांनी तेलंगणा राज्याचे मुख्य नवोपक्रम अधिकारी म्हणून काम केले आणि सरकारला विशेष सहकार्य केले.