वाघोली (प्रतिनिधी) : कदमवाकवस्ती येथील रा.मा.९ ते गायकवाडवस्ती ते लोणीकाळभोर पर्यंतचा रस्ता या रस्त्याचे प्रलंबित काम ८ दिवसामध्ये सुरु न केलेस उपोषण करण्याचा इशारा कदमवाक वस्ती ग्रामपंचायतीच्या सरपंच गौरी चित्तरंजन गायकवाड यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. पुणे येथील रा. मा. ९ ते गायकवाडवस्ती ते लोणीकाळभोरपर्यंत हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर असून या रस्त्याचे आपण काम पूर्ण केलेले नाही. तसेच रा. मा. ९ ते पांडवदंड रस्ता वाकवस्ती परिसरात रस्त्याचे काम अपूर्ण आहे.
आहे. या रस्त्यात ठिकठिकाणी पावसाचे पाण्यामुळे मोठमोठे खड़े पडून या रस्त्यावरील रहदारी
नाग रिकांना ये जा करताना हाल होत असून नागरिक संतप्त झाले आहेत.मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रस्त्याची कामे इतर गावात चालू आहेत परंतु कदमवाकवस्ती येथील याच रस्त्याचे काम बंद आहे. जर आपण सदर काम आठ दिवसात सुरु केले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा कदम वाक वस्ती ग्रामपंचायतीच्या सरपंच गौरी चित्तरंजन गायकवाड यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.