नागपूर पोलिसांच् “विक्रम” बद्दल भन्नाट ट्विट

नागपूर: इस्रोच्या “चांद्रयान २” मोहिमेतील विक्रम लँडर अवघ्या २.१ किलोमीटरवर असताना त्याच्याशी संपर्क तुटला आणि संपूर्ण देशवासीयांच्याआनंदावर विरजण पडले. परंतु सोमवारी विक्रम लँडरचा तपास लागल्याचं इस्रोकडून सांगण्यात आलं आणि पुन्हा सर्वांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत. या संदर्भातच नागपूर पोलिसांनी विक्रम लँडरबाबत एक भन्नाट ट्विट केलं असून ते सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

दरम्यान “प्रिय विक्रम, कृपया प्रतिसाद दे. तू सिग्नल तोडलंस तरी आम्ही चलान फाडणार नाही,’ असं ट्विट नागपूर शहर पोलिसांनी केलं. त्यावर नेटकऱ्यांनी चांगली दाद देत नागपूर पोलिसांच्या या ट्विटच कौतुक केलं आहे. ‘नागपूर पोलीस अगदी बरोबर बोलले. विक्रमकडून १३३ कोटी भारतीयांना आशा आहे. नागपूर पोलिसांचं ट्विट अफलातून आहे, यांसारख्या अनेक प्रतिक्रिया या ट्विट ला येत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.