बंगळूर: भारतीय अवकाश संशोधन संघटना (इस्रो) ने अद्याप आशा सोडलेली नाही. इस्रो सध्या ‘हार्ड लँडिंग’ नंतर चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या ‘चंद्रयान -२’ लँडर ‘विक्रम’शी संपर्क साधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. शनिवारी, चंद्रच्या पृष्ठभागापासून 2.1 किलोमीटरवर असताना ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्याचा प्रयत्नात शेवटच्या क्षणी विक्रमचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला.
दरम्यान, “ऑर्बिटर कॅमेऱ्यातून पाठविलेल्या छायाचित्रांनुसार विक्रमचे नियुक्त केलेल्या जागेच्या अगदी जवळ ‘हार्ड लँडिंग’झाले होते. लँडर त्याठिकाणी सुस्थितीत असून त्याचे तुकडे झालेले नाहीत. तो झुकलेल्या स्थितीत आहे”, अशी माहिती या अभियानास संलग्न असलेल्या इस्रोच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.